Showing posts with label हास्या. Show all posts
Showing posts with label हास्या. Show all posts

Wednesday, 23 January 2013

हास्या - ३

ठिकाण: मडीकेरी(कर्नाटक), एक रम्य कॉफीचा मळा, आजूबाजूला काळ्या मिरीचे वेल...एकूण काय तर वातावरण इतकं सुंदर की मनात वाटतच होतं की आज एकतरी हास्या भेटेलच...इकडे तिकडे शोध घेत असतानाच सखी अशी काही भेटली की वाटलं हीच हास्या...आणि मग सखीला कॅमेऱ्यात बंदिस्त करून मिळाली ती अपूर्व हास्या!!!

Sunday, 29 July 2012

हास्या - २

एका सुंदर सकाळी पुन्हा एकदा एक हास्या दिसावी आणि ती अशी अलगद प्रकाशचित्रात साठवता यावी यासारखं दुसरं समाधान कशात नाही...

आमच्या शेजारी दोन दिवस पाहुणी म्हणून आलेली ही अजून एक हास्या...


Saturday, 30 June 2012

हास्या - १

व. पु. काळेंनी त्यांच्या "रंगपंचमी" पुस्तकात लिहिलंय, "प्रसन्न मनानं हसणारी व्यक्ती ही एकमेव सुंदर व्यक्ती असते. काळालाही ज्या गोष्टीवर मात करता येत नाही, ती गोष्ट म्हणजे प्रसन्न हास्य."

असंच एक प्रसन्न हास्य कब्बन पार्क, बंगलोर इथं फिरत असताना कॅमेऱ्यात बंदिस्त करता आलं.