आजवर तू आहेस या खात्रीनं
असंख्य जीव तुझ्या उंबऱ्रयावर माथा टेकवत आले
गाभाऱ्यातल्या शेंदूर फासलेल्या दगडात तुच आहेस या समजुतीवर
कित्येक असुरक्षित मनं आपल्या भक्कम भविष्याची स्वप्नं पाहत राहिली
काळ्याकुट्ट अंधारात कितीतरी जणांनी चाचपडत अडखळत वाट सर केली
ती निव्वळ तुझ्या भरवशावर
…पण पांडुरंगा आता सगळं काही बदललंय बरं का…
आता तुझ्या अस्तित्वावरच आम्ही घाला घालून रिकामे झालोय
तुझ्या गभाऱ्यामध्ये आता फक्त आम्ही गल्ले भरुन घेतोय
तू असलास काय आणि नसलास काय फरक तसा फरसा पडत नाही
तुझं गुणगान केल्यावाचून किंवा तुला दंडवत घताल्यावाचून आताशा कुणाचंच काही अडत नाही
या भरलेल्या जगामध्ये आम्हाला आई-बापाचा पण भार होऊ लागलाय
गर्दीमधला आपलाच माणूस आम्हाला परका वाटू लागलाय
बळी खुशाल कान पिळतोय आणि सोसणारा निमूट मूग गिळतोय
आता तर भर उजेडातही नीतिमत्तेचा तोल ढासळतोय
पाप-पुण्य श्रद्धा-बिद्धा वगैरे सारं आता आउटडेटेड झालंय
डीजे डॉल्बी आणि ढोल ताशे हेच तुझ्याहुन थोर झालंय
आमच्या इथल्या देवळांमधुन आम्ही केव्हाच तुला हद्दपार केलंय
तू आता तुझ्या गावी निघून जा…
विठ्ठला, आम्ही व्ही. आर्. एस्. देऊन केव्हाच तुला निवृत्त केलंय

mast... khup chan
ReplyDelete